महाराष्ट्राच्या युवा धोरण समितीवर सनी विनायक निम्हण यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती.
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सुधारित युवा धोरण समितीवर सनी विनायक निम्हण यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून, हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची आणि युवकांमधील नेतृत्वक्षमतेची राज्य शासनाने घेतलेली दखल असल्याचे मानले जात आहे.
राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रात युवकांसाठी दिशा ठरवणाऱ्या महत्वाच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत सहभागी होण्याची ही संधी निम्हण यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारी ठरणार आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सनी निम्हण यांनी सांगितले की,
“राज्यातील युवकांच्या अपेक्षा, गरजा आणि स्वप्ने यांना सक्षम व्यासपीठ मिळावे, हे माझे ध्येय आहे. माझ्यावर राज्य शासनाने ठेवलेला विश्वास मी कृतीतून सिद्ध करणार आहे.”
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार तसेच क्रीडामंत्री मा. माणिकराव कोकाटे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सनी निम्हण यांनी सामाजिक बांधिलकी, कौशल्यविकास, युवक नेतृत्व घडविणे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांच्या क्षमतांना नवे आयाम दिले आहेत. कोविड काळातील त्यांच्या सेवा उपक्रमापासून ते शैक्षणिक- क्रीडा प्रोत्साहनापर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांच्या कार्याची नोंद आहे.
सनी निम्हण यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या भविष्यकालीन युवा धोरणात एक सकारात्मक, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टीकोन प्रतिबिंबित होणार, अशी व्यापक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.