श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर देवस्थान आयोजित भव्य रक्तदान शिबिर
पुणे: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर देवस्थान तर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक ८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पाषाण येथील सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सोमेश्वर देवस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी वैद्यकीय सुविधा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि सुरक्षित वातावरण प्रदान केले जाणार आहे.
याबाबत माहिती सांगताना शिबिराचे संयोजक मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम आपण राबवत असून समाजामध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता होऊन अधिकाधिक लोकांनी रक्तदाते म्हणून पुढाकार घ्यावा असा आपला उद्देश आहे. दरवर्षी आपण 1000 रक्तदात्यांचा टप्पा पार करत असून याही वर्षी आम्ही 1000 रक्तदात्यांचा टप्पा पार करू असा आम्हाला विश्वास आहे”
रक्तदान हा एक अत्यंत महत्त्वाचा व जीवनदायी उपक्रम आहे. तरी या शिबिरासाठी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन सनी निम्हण व सोमेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.