Social Media वरील Physiotherapist Fake Video बाबत आ. सत्यजीत तांबे यांचे आवाहन
सोशल मीडियावर Chiro Treatment आणि Unscientific Physiotherapy संदर्भात अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे उपचार तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी गंभीर चिंता व्यक्त करत Indian Association of Physiotherapists (IAP) आणि सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
आ. सत्यजीत तांबेनी नाशिक येथे झालेल्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपीस्ट (IAP) च्या ६५ व्या अधिवेशनात फिजिओथेरपीस्ट संदर्भात असे मत मांडले :
✅ Physiotherapy हे शास्त्रीय उपचार असून भारतात त्याचा प्रसार कमी आहे.
✅ जर्मनी (100), फ्रान्स (50), अमेरिका (15) प्रति 1000 नागरिकांमागे Physiotherapists असताना, भारतात केवळ 0.5 आहेत.
✅ Social Media वर सोशल मीडियावर अशास्त्रीय उपचार पद्धतींचा प्रसार, लोकांच्या आरोग्यास धोकादायक असून अशा Fake Physiotherapists च्या व्हिडिओंना मोठी Viewership मिळत आहे, ती देखील धोकादायक आहे.
✅ Registered आणि Certified Physiotherapists कडूनच उपचार व्हावेत, यासाठी कठोर नियम हवेत.
✅ सरकारकडे Physiotherapy क्षेत्राच्या विकासासाठी धोरणात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आरोग्यासोबत खेळणाऱ्या या Fake Physiotherapy व्हिडिओंवर त्वरित आळा घालण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे असे मांडताना लोकांनीही योग्य आणि प्रमाणित तज्ज्ञांकडूनच उपचार घ्यावा, हीच खरी सावधगिरी असल्याचे सत्यजीत तांबे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.