पंढरपूर येथील गुरसाळे व चिलाईवाडी येथे रस्ते व कॅनॉल पुलाचे भूमिपूजन!

रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन...


मौजे गुरसाळे व चिलाईवाडी (ता. पंढरपूर) येथे आमदार बबनरावजी (दादा) शिंदे आणि रामभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ३ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि ४ कॅनॉल पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जलसंपदा व पुनर्वसन विभागाकडून २५१५ योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे भूमिपूजन जिल्हा दूधसंघाचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे यांचं हस्ते करण्यात आले. या निधीमुळे या भागातील नागरिकांच्या समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असे रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी सांगितले. यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजाभाऊ गायकवाड, सरपंच दीपक शिंदे, पं.स.स. राजेंद्र आण्णा पाटील, महादेव आण्णा पाटील, जि.प. सदस्य अनंत बापू पाटील, औंदुबर भोसले, सुधाकर कवडे, नानासाहेब कवडे, विठ्ठल बाबा पाटील, रामेश्वर माने, संदीप पाटील, लहू घटूकडे, सोमनाथ पाटील, सोमनाथ जाधव, वैभव पाटील, हनुमंत पाटील, पुनर्वसन विभागाचे चमारीया साहेब आणि बांधकाम विभागाचे जाधव साहेब आदि मान्यवर उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.