पुणे आयडॉल २०२४ स्पर्धेत सनी निम्हण यांच्या कार्याचा गौरव करणारे गाणे संगीतबद्ध

इंडिअन आयडॉल स्पर्धक सुरेश कदम यांनी गाणे बनवत केले सादर

पुणे : पुणे आयडॉल २०२४ स्पर्धाची महाअंतिम फेरी नुकतीच बालगंधर्व रंगमंदिर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी पुणे आयडॉल स्पर्धक ते इंडिअन आयडॉल स्पर्धेतील स्पर्धक अशी झेप घेणारे सुरेशजी कदम यांनी युवा नेतृत्व सनी निम्हण यांच्यावर एक सुंदर गाणे बनवले आणि पुणे आयडॉल स्पर्धेच्या महाअंतिम फेरीदरम्यान ते गाऊनही दाखवले. यावेळी उपस्थित पुण्यनगरीचे खासदार व केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवरांनी या गाण्याला टाळ्या वाजवत दाद दिली.

स्व. विनायक आबा निम्हण पुणे आयडॉल स्पर्धा सुरु केल्यापासून अनेक नामवंत कलाकार यातून घडले. आज ते वेगवेगळ्या ठिकाणी चांगले नाव कमावत आहेत. याच पुणे आयडॉल स्पर्धेतील एक जुने स्पर्धक सुरेश कदम यांनी मराठी इंडिअन आयडॉल स्पर्धा देखील गाजवली आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक व संगीतकार अजय-अतुल यांनी देखील त्यांच्या गायनाचे कौतुक केले होते.

स्व. विनायक आबा निम्हण यांनी यांच्या सामजिक कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम युवा नेतृत्व सनी निम्हण हे करत आहे. सर्वसामान्य जनतेची सेवा करणाऱ्या माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची सुरेश कदम यांनी सोशल मिडीयावर माझ्या सामाजिक कार्याची माहिती घेत एक सुंदर गीत बनवले आहे. याबद्दल सनी निम्हण यांनी त्यांचे आभार देखील मानले.

त्याच बरोबर सुरेश कदम यांनी गायलेले गाणे ऐकून मी खूप भावनिक झालो. या गाण्यामुळे जनतेच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची देखील जाणीव यावेळी मला झाली. याबद्दल मी आपला मनापासून आभारी असल्याची भावना सनी निम्हण यांनी बोलून दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.