शिवसृष्टी प्रकल्पाचे काम जलद गतीने करण्याच्या मंत्री भुजबळ यांच्या प्रशासनाला सूचना
येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची भुजबळ यांच्याकडून पाहणी
येवला,दि.२५ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संबंधित कंत्राटदाराला काम जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मतदारसंघातील जनतेला कळावा यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून यासाठी निधी मिळवला आहे. या स्मारकामुळे येवला शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणाला नक्की भेट देतील अशी या स्मारकाची रचना करण्यात आली आहे. हे स्मारक पूर्ण करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ स्वत: सातत्याने पाहणी करत आहेत. व आवश्यक त्या सूचना करताना दिसून येत आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे सभापती किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सचिन कळमकर, सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, गोटू मांजरे, विकी बवाल, सुमित थोरात,मलिक मेंबर, सचिन सोनवणे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.