स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील, पाषाण भागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व महादेव एकनाथ निम्हण यांचे निधन

पुणे : पुणे शहरातील यशस्वी उद्योजक, पाषाण भागातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांचे वडील महादेव एकनाथ निम्हण यांचे वयाच्या ८८‌व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.

महादेवदादा यांनी वीट भट्टीचा व्यवसायाने आपल्या उद्योगाची पायाभरणी करत त्यांनी कालांतराने विविध उद्योगांमध्ये घवघवीत यश मिळवले. या काळात त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मदत केली. त्यांच्या सुख:दुखात सहभागी झाले. त्यामुळे अल्पावधीत ते लोकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले. त्यांनी आपल्या मुलांना देखील चांगल्या संस्काराने वाढवले .

पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळेचे आमदार स्व. विनायक निम्हण हे महादेव दादांचे पुत्र होते. विनायक निम्हण यान घडवण्यात त्यांचा मोलाचा वाट राहिला आहे. त्यांच्या अष्टपैलू नेतृत्वाची झलक विनायक आबांमध्ये कायम दिसून येत होती. याच शिकवणुकीनुसार स्व. आबांनी गोर गरीब जनतेपासून सर्वसामान्य जनतेपासून सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र परिवार तयार केला होत.

मागील वर्षी दिवाळी मध्ये स्व. विनायक आबंचे निधन झाले. त्यानंतर लगेच एक महिन्यात त्यांच्या आई सावित्री महादेव निम्हण यांचे आज वृद्धापकळाने निधन झाले. अवघ्या वीस दिवसांत निम्हण कुटुंबियांवर दूसरा दु:खाचा डोंगर कोसळला होता. यानंतर आज निम्हण कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महादेव निम्हण हे मा. नगरसेवक सनी निम्हण आणि मा. नगरसेवक अमित गावडे यांचे आजोबा होते.

Leave A Reply

Your email address will not be published.