पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराची चर्चा थेट दिल्लीपर्यंत!

आज आपण समाजात अनेक सामाजिक उपक्रम बघतो! विशेष समाधान या गोष्टीचं वाटत की आरोग्य विषयाकडे समाजात आता डोळसपणे बघितलं जातं आहे. आज अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आरोग्य शिबिराचे उपक्रम राबवत असतात. पण या शिबिराला व्यापक स्वरूप जेव्हा मिळत, तेव्हा नक्कीच सर्व सामान्य जनतेला त्याचा लाभ होतो.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे ३ वेळा आमदार राहिलेले स्व.विनायक निम्हण यांचा प्रथम स्मृतिदिन मागे पार पडला. आबांची संपूर्ण हयात गोरगरीब जनतेची सेवा करण्यात गेली. त्यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य या विषयाकडे खूप महत्व दिले. त्यांच्या याच आदर्शवर त्यांची पुढील पिढी वाटचाल करत आहे. आबांचे सुपुत्र, माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुण्यात महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. यामध्ये जवळपास ५९ हजार ६०० लोकांची तपासणी झाली व तर अनेक ऑपरेशन पूर्णतः मोफत करण्यात आले. हा आकडाच हे शिबिर किती मोठ्या स्वरूपात होते हे सांगण्यास पुरेसे आहे. महाराष्ट्रातील आजपर्यंत चे हे सर्वात मोठे आरोग्य शिबिर ठरले. त्यातच हे शिबिर पुण्यात झाल्याने दिल्ली पर्यंत त्याची चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.