ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. सोलापुरात असलेल्या कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कुटुंबांना चाव्या हस्तांतरीत केल्या. यावेळी विविध विकासकामांचेही मोदींनी लोकार्पण केलं आहे.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आमदार राम सातपुते उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार राम सातपुते यांनी मोदिजींच्या गॅरंटी वर बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न मोदीजीनीं केला. प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला गस योजना असेल किंवा गरिबी हटाव च्या माध्यामतून सर्वसामान्य नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मागच्या १० वर्षात मोदीजीनीं केलेले आहे. मागील अनेक वर्षापसून गरिबी हटाव नारा देणाऱ्या कॉंग्रेसने कधी देशातील नागरिकांची गरिबी दूर केली नाही असा टोला देखील त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.
मोदीजी म्हटले होते, ज्या प्रकल्पाचे मी भूमिपूजन करेल त्या प्रकल्पाच्या उद्घाटनास देखील मी येईल, आज त्यांनी आपलं शब्द खरा केला आहे. देशातील शेवटच्या घटकाला घर मिळाले पाहिजे हे पंडित दीनदयाळ यांचे स्वप्न आज मोदीजी पूर्ण करत आहेत. मोदीजी फक्त आश्वासने देत नाहीत तर ते पूर्ण करतात. देशभरातील काश्मीर ते कन्याकुमारी व नॉर्थ ते इस्ट पर्यंतच्या सर्वसामान्य नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोदीजी सातत्याने करत आहेत.
या देशात श्री राम मंदिराचे उद्घाटन होत असताना भारत जी- 20 चे नेतृत्व करतोय, सोलापुरात १५ हजार कुटुंबाना घरे मिळत आहेत. भारत चंद्रावर पोहचलाय याच जोरावर जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत एक विश्वगुरु म्हणून पुढे येत असल्याचे देखील आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे.