येवला शिवसृष्टी प्रकल्पपूर्तीकडे भुजबळांचे विशेष लक्ष काम प्रगतीपथावर, कामाची भुजबळांकडून पाहणी

शिवसृष्टी प्रकल्प एप्रिल पर्यंत पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,येवला, दि.१५ जानेवारी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित येवला शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम येत्या एप्रिल पर्यंत पूर्ण करा अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,शहराध्यक्ष दीपक लोणारी,सचिन सोनवणे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावा या दृष्टीने शिवसृष्टी प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे अकरा कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करून एप्रिल २०२४ पूर्वी सदर प्रकल्पाचे काम पूर्ण करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

येवला शिवसृष्टीमध्ये या कामांचा असेल सामावेश..

येवला शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील प्रतिकृती असलेला सिंहासनाधिष्टीत पुतळा, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित म्युरल्स, आर.सी.सी गॅलरी,म्युझियम,कॅफेटेरीया,आर.सी.सी बुरुज,ओ.व्ही हॉल, फाऊंटन ,पर्यटन सुविधा केंद्र, विक्री केंद्र, इतर अनुषंगिक पुतळे,स्वच्छतागृह, लॅडस्केपिंग,गार्डनिंग, पेंटीग्ज,पाणीपुरवठा,मलनिस्सारण प्रकल्प, आग्निप्रतिबंधक यंत्रणा, इलेक्ट्रीक कामे, सुशोभिकरणाची कामे या कामांचा समावेश असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.