पाषाण येथील सोमेश्वर महादेव मंदिरात होणार आनंदोत्सव साजरा; प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानेनिमित्त उपस्थित राहण्याचे सनी निम्हण यांचे आवाहन
पुणे – भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत अनेक विधी होतील. देशभरात यानिमित्त स्थानिक स्थरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे आहे.
प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा मंगल प्रसंग संपूर्ण देशात एक महा-उत्सव म्हणून साजरा केला जावा, असे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केले. या ला प्रतिसाद देत पाषाण येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिरात भव्य कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आनंद सोहळा, गीत रामायण, भव्य दीपोत्सव, महाआरती व मंगल आतिषबाजीचे आयोजन करण्यात येत आहे.
प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठानेचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमेश्वर महादेव मंदिरात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक सनी निम्हण यानी केले आहे.