“महाराष्ट्राने घेतली ‘या’ सोहळ्याची दखल!” भुजबळांनी कोणत्या सोहळ्याबद्दल काढले कौतुकोद्गार?
सुविचार गौरव हा नाशिक मधील अतिशय महत्वाचा पुरस्कार असून संपूर्ण महाराष्ट्राने या सोहळ्याची दखल घेतली आहे. त्यामुळे हा सुविचार गौरव अतिशय महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
सुविचार मंच आयोजित ४ था सुविचार गौरव पुरस्कार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला. आपापल्या क्षेत्रांत आपल्या कामाच्या माध्यामतून कर्तृत्व गाजवणाऱ्या विविध क्षेत्रांतील खालील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव)
अभिनेते गौरव चोपडा (कला)
अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार)
श्री. रामचंद्रबापू पाटील (सामाजिक)
डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय)
डॉ. शेफालीताई भुजबळ (शैक्षणिक)
श्री. दत्ता पाटील (साहित्य)
श्री. चंद्रशेखर सिंग (उद्योग)
श्रीमती संगीताताई बोरस्ते (कृषी)
प्रा.नानासाहेब दाते (सहकार)
कु. गौरी घाटोळ (क्रीडा)
या पुरस्कारार्थींना उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील समाजात चांगल्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून नाशिकमध्ये सुविचार मंच ही संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी नाशिकच्या कलाकारांकडून अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
या सोहळ्यास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आ. दिलीप बनकर, आ.दिलिप बोरसे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, विष्णुपंत म्हैसधुणे,लक्ष्मण सावजी, राजेंद्र डोखळे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, डॉ. स्वप्नील तोरणे, प्रा . विनोद गोरवाडकर, प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सुविचार मंचचे ऍड. रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.