शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. राम सातपुते विधानसभेत आक्रमक; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून सकरात्मक प्रतिसाद

माळशिरस: माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आणि विजेच्या प्रश्नावर आमदार राम सातपुते विधानसभेत आक्रमक होत शेतकरी हिताच्या मागण्या केल्या. या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

सध्या माळशिरस तालुक्यात वीज वहन करणाऱ्या तारांच्या जुन्या लाईन बदलण्याचे काम सुरु आहे. तसेच नवीन लाईन टाकण्याचे देखील काम सुरु आहे. यापूर्वी अशी कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ठेकेदारांना पुन्हा ही कामे देऊ नयेत अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केले.

तसेच शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या विजेच्या लाईन्सच्या सर्किटमुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकाला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे,मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या विषयी आमदार राम सातपुते यांनी प्रश्न उपस्थित करत नव्याने सुरु होणाऱ्या विजेच्या लाईन्स शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरून न नेता इतर मार्गाने न्याव्यात अशी मागणी देखील विधानसभेत मागणी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असलेल्या महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या महत्वाचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार राम सातपुते यांना शाबासकी दिली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या या प्रश्नाविषयी मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.