शिक्षकांचे असंख्य प्रलंबित प्रश्न पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व शाळांची डागडुजी करणे, शिक्षकांचे पगार वेळेवर न होणे, आयटीचे क्लासेस सुरू करणे, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करणे, पगार कपात करू नये, केंद्र समन्वयक पदी सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांची नेमणूक करावी, शिक्षकांना मानीव वेतनवाढ देणे या शिक्षकांच्या प्रलंबित आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिक्षक संघटना या आपल्या मागण्यांसाठी प्रचंड ऍक्टिव्ह असतात. हे सर्व शिक्षक एकजुटीने आपल्या मागण्या लावून धरत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा याविषयी पाठपुरावा करताना दिसतात.

 

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिक महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. आमदार सत्यजीत तांबे यांनी या बैठकीत शिक्षकांच्या सर्व समस्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या. या समस्या मांडत असताना त्यांनी यावर किती सखोल अभ्यास केला होता, हे तिथे उपस्थित असणारे सांगत होते. समस्या मांडणारा लोकप्रतिनिधी जर प्रभावी व हुशार असेल तर प्रशासन सुद्धा गतिमान होते. येत्या काळात या समस्यांना न्याय मिळेल, अशी भावना शिक्षकांची आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.