सत्यजीत तांबेंच्या जागतिक परिषदेत बाळासाहेब थोरातांनी केले डॉ. सुधीर तांबेंचे कौतुक!
प्रतिनिधी,
गांधींच्या विचारांचे महत्त्व, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच महत्त्व तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजेत असे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त केले आहे. ते मुंबई येथे आयोजित जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषेदेत बोलत होते. ज्यांनी भारताला सत्य आणि अहिंसाचा मार्ग दाखवला असे महात्मा गांधी! भारत तसेच भारताबाहेरील अनेक देशांत गांधी विचारसरणी मानणारे अनेक लोकं आहेत. परंतु देशात कुठेतरी गांधी विचार हरवत चालले आहेत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
जयहिंद लोकचळवळीने चांगले वळण घेतले असून ती प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहे. डॉ. सुधीर तांबे हे पुरागामी विचाराचे नेते असून त्यांच्या जे जे संपर्कात आले, त्याचं चांगलं झालं, असे बाळासाहेब थोरातांनी डॉ. सुधीर तांबे यांचं कौतुक केले. महाराष्ट्रात दरवर्षी जयहिंद लोकचळवळ आयोजित जागतिक परिषद होते. मुंबई येथे झालेल्या तीन दिवसीय या जागतिक परिषदेला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.