सत्यजीत तांबे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्सला ‘व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या’ संस्थापिका अरनाझ हाथीराम यांची उपस्थिती!

प्रतिनिधी,

पुरुषांवर अनेकदा बलात्काराच्या खोटे आरोप लावले जातात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्या पुरुषाचे नाव जाहीर करू नये असे व्हाईस फॉर मॅन इंडियाच्या संस्थापिका अरनाझ हाथीराम यांनी त्यांचे मत मांडले. त्या मुंबई येथे झालेल्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर बोलत होत्या.

बऱ्याचदा महिला पुरुषांचा बदला घेण्यासाठी खोटे आरोप करतात असे बरेच खटले भारतात आहेत. खऱ्या खटल्यांचा निकाल लागायला वेळ लागतोय, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. मुंबई येथे जयहिंद लोकचळवळ आयोजित तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्समध्ये अनेक तज्ज्ञांनी हजेरी लावली होती. सुदृढ समाज निर्मितीसाठी जयहिंद लोकचळवळ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.