सत्यजीत तांबेंच्या जयहिंद लोकचळवळने आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत ग्रामीण विकासाबाबत चर्चा

प्रतिनिधी,

विकासदाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक असला तरी साक्षरतेच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. विकासाच्या निर्णयांत ग्रामीण भागांचा समावेश नसल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील साक्षरता दरात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते, असे मत गरज पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील रोहोकले यांनी मांडले. ते मुंबई येथे झालेल्या जयहिंद लोकचळवळ आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समध्ये बोलत होते.

संधी देण्यापेक्षा त्या निर्माण करण्याची गरज जास्त आहे आणि यातूनच सर्वसमावेशक विकास होईल अशीही भावना त्यांनी या ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यक्त केली. जयहिंद लोकचळवळ आयोजित तीन दिवसीय जागतिक परिषद मुंबई येथे पार पडली. या परिषदेला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.