IMF चा इशारा: अमेरिकेने कर्ज न चुकवल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार गंभीर परिणाम 

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका देखील कर्ज फेडण्यात डिफॉल्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) असे म्हणत गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. IMFने म्हटले की जर अमेरिकेने कर्ज फेडण्यात हलगर्जीपणा केल्यास केवळ जागतिक महासत्तेवरच नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा फटका सहन करावा लागू शकतो.

अमेरिकेने कर्ज न चुकवल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स हे दोन पक्ष कर्जाच्या मर्यादा या मुद्द्यांवर विभागले गेले आहेत, कर्जाच्या मर्यादेवर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या दोन्ही पक्षांची मतभिन्नता समोर आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन प्रशासनाने कर्ज मर्यादा वाढवण्याच्या बदल्यात बजेटमध्ये कपात करण्यास सहमती द्यावी, अशी यूएस काँग्रेसमधील रिपब्लिकन मागणी करत आहेत. तसे झाले नाही तर अमेरिकेवरील कर्जाचे संकट अधिक गडद होऊ शकते. तर दुसरीकडे डेमोक्रॅट्सना कर्जाची मर्यादा वाढवायची आहे. रिपब्लिकन आपला राजकीय अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप ते करत आहेत. IMF च्या संचालक ज्युली कोझॅक यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्व पक्षांनी तातडीने या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.