Dipa Karmakar Ban: जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह २१ महिन्यांची बंदी
भारताची स्टार जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर अपात्रतेसह २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दीपने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तपासणी यंत्रणेच्या चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळले. दीपावर करण्यात आलेली ही कारवाई १० जुलै २०२३ पर्यंत लागू असेल. आयटीएने दिलेल्या माहितीनुसार एफआयजी अँटी डोपिंग नियमांच्या कलम १०.८.८ नुसार या प्रकरणाची सुनावणी झाली.