अनुराग कश्यपने सांगितलं येणार नाही ‘सेक्रेड गेम्स ३’, जाणून घ्या ‘तांडव’ कशी ठरली जबाबदार
बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सध्या आपल्या ‘अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलाया एफ आणि करण मेहता यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुराग कश्यपने ‘सेक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा सीझन करणार नसल्याचा खुलासा केला. यामागचे कारणही त्यांनी सांगितले. ‘तांडव’च्या वादानंतर आता ओटीटीमध्ये हिंमत उरली नसल्याची तक्रार त्याने केली.
सेक्रेड गेम्स ही खूप लोकप्रिय वेब सीरिज आहे. यात सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, नीरज काबी, जितेंद्र जोशी, राजश्री देशपांडे, करण वाही, पंकज त्रिपाठी, कुब्ब्रा सैत, सुरवीन चावला, रणवीर शोरे आणि कल्की कोचलिन यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. या शोचा पहिला सीझन २०१८ मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरा सीझन आला.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुराग कश्यपने दिलेल्या मुलाखतीत ‘सेक्रेड गेम्स’बद्दल सांगितले. अनुरागने विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांच्यासह सीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनचे सह-दिग्दर्शन केले होते. पहिल्या सीझनच्या तुलनेत दुसरा सीझन फारसा हिट झाला नाही. पण सीरीज अधिकृतरित्या बंद करण्यात आल्याची माहिती अद्याप नेटफ्लिक्सकडून आलेली नाही.
नेटफ्लिक्सने ती बंद केल्याचा खुलासा अभिनेता अनुराग कश्यपने केला.ते पुढे म्हणाले, सुरुवातीला मी सीझन २ चा भाग नव्हता, विक्रमादित्य मोटवानेला हेच होते. दहा दिवसानंतर मला ‘मुक्काबाज’ची शूटिंग करायची होती, विक्रमादित्यने मला बोर्डवर येण्यास सांगितले. याआधी त्यांना मी योग्य वाटत नव्हतो. त्यांच्यामते माझ्याकडे स्त्री प्रेक्षकवर्ग नव्हता.
चित्रपट निर्माते अनुराग पुढे म्हणाले की, ओटीटीमध्ये आता हिंमत राहिलेली नाही. ‘तांडव’च्या वादानंतर सर्वजण घाबरले आहेत. हा शो अभिनेता मोहम्मद झीशान अय्युबच्या एका दृश्यामुळे वादात सापडला होता. या सीरीजचा निर्माता अली अब्बास जफरने सीन बदलला होता.
अनुराग कश्यपने आपल्या ‘पांच’ चित्रपटातील सीन लीक होण्यामागे त्यांचाच हात असल्याच्या अफवांचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितली की, मी स्वतःसाठी एक प्रिंट बनवली होती, जी मी लोकांमध्ये वाटली त्यामुळे त्यापैकी कोणीही ती लीक करू शकते. ब्लॅक फ्रायडे पायरेटेड झाल्याचा खुलासासुद्धा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की मी त्या प्रती मोठ्या प्रमाणात विकत घ्यायचो, त्या बॉक्समध्ये ठेवायचो आणि अमेरिकेत वितरित करायचो.
अनुरागचा चित्रपट अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत हा ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अनुरागने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा रोमँटिक ड्रामा चित्रपट असेल. यात अलाया एफ आणि नवागत करण मेहता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.