गोवा ट्रिप, आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…; अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी नवा खुलासा

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर सुसाईड प्रकरणाचं खरे कारण समोर आले आहे. ज्यामुळे तिच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे. तिचा विवाहित बॉयफ्रेंड राहुल नवलानीने तिला हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी दबाव टाकला. त्याने वैशालीसोबत असं काही केले ज्यामुळे तिला धक्का बसला होता. ती मनाने खचली होती ज्यात तिने मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला. अखेर वैशालीसोबत काय घडले? तिला आत्महत्या का करावी लागली? याचा खुलासा झाला आहे.

ससुराल सिमर का या मालिकेतून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर सुसाईड प्रकरणात खरे कारण समोर आल्याने सर्वच हैराण झाले. वैशालीने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे तिला विवाहित बॉयफ्रेंड राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी त्रास देत असल्याचं सांगितले जात होते. परंतु आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. त्याने राहुलने गोव्यात सुट्टीला गेला असताना वैशालीचा अश्लिल व्हिडिओ शेट केला होता आणि केवळ शूटच नव्हे तर त्याने हा व्हिडिओ वैशालीचा होणारा नवरा मितेश गौरलाही पाठवला होता. ज्यानंतर मितेशने वैशालीसोबतचं लग्न मोडले होते. या घटनेने वैशालीला धक्का बसला तिने घरीच गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी इंदूर कोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात म्हटलंय की, वैशाली तिचा मित्र राहुलसोबत ऑगस्ट २०२१ मध्ये गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी तिने आणि राहुलने हॉटेल कासा बुटीकमध्ये रुम नं ९ मध्ये २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट थांबले होते. यावेळी हे दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले होते आणि दोघांमध्ये लग्नावरून बोलणं झाले होते.

मात्र कहानीत ट्विस्ट की राहुलने ना केवळ विवाहित असतानाही वैशालीसोबत जवळीक साधली, आणि तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तर गोवा हॉटेल रुममध्येच त्याने चोरून वैशालीसोबतचा अश्लिल व्हिडिओ बनवला. त्यानंतर राहुलने वैशालीसोबत लग्न केले नाही. तर जेव्हा वैशालीनं दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याची तयारी केली तेव्हा राहुल आणि त्याच्या पत्नीने वैशालीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मात्र हद्द म्हणजे राहुलने हा व्हिडिओ वैशालीचा होणारा नवरा मितेशला पाठवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मितेशने वैशालीसह नाते तोडण्याचा निर्णय घेतला. या घटनेने वैशालीला मानसिक धक्का बसला. तपासात राहुलचे हे कृत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मितेश गौरला चौकशीसाठी बोलावले. मात्र मितेशने पोलिसांना अमेरिकेहूनच इन्स्टाग्राम व्हिडिओ चॅट, फोटो, स्क्रीनशॉट्स पाठवले. ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.