Tax Saving Tips: बजेट २०२३ पूर्वी करबचत करण्याचे प्रभावी मार्ग, ‘या’ फॉर्म्युल्याचा करा वापर

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी संसदेत मांडले जाणार आहे. या निमित्ताने पगारदार वर्गाला, जे कर कपातीच्या क्षेत्रात येतात, त्यांची चिंता वाढली आहे. यामागचे कारण म्हणजे यंदा त्यांना नवीन आयकर स्लॅबनुसार कर भरावा लागणार आहे. मात्र, प्राप्तिकर रिटर्न वेगवेगळ्या कर स्लॅबनुसार भरता येते. अशा परिस्थितीत लोकांचा पगार करपात्र असतो, ते आयकर वाचवण्यासाठी अनेक उपाय योजना करतात. यासाठी काही गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आयकर योग्य पद्धतीने वाचता येईल आणि फायदाही होईल.

सध्या आपल्या समोर कर बचत करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जे तुमच्या पैशात वृद्धी करतेच पण तुमच्या टॅक्सचे ओझंही कमी करण्यास मदत करू शकते. गुंतवणुकीचे पर्याय शोधताना करदात्यांनी प्रथम त्यांच्या गुंतवणुकीचा उद्देश लक्षात घ्यावा. त्यांचे गुंतवणुकीचे लक्ष्य केवळ कर बचत करण्याचे आहे किंवा त्यांना त्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळवायचा आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

सध्याच्या काळात कर बचतीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत, पण त्यातून मिळणारा परतावा कमी आहे. बँक एफडी, याचे प्रमुख उदाहरण आहे. बँकेतील मुदत ठेवी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहेत, पण त्यातून मिळणार परतावा सहसा जास्त नसतो. मात्र, रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही एफडीवरील परताव्यात वाढ केली आहे. त्याचवेळी, कर बचत एफडीमध्ये मर्यादेनंतर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो.

जर तुमचे मुख्य लक्ष कर बचत करून चांगला परतावा मिळवण्याचे असेल तर तुम्ही इतर काही योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये मुदत ठेवीपेक्षा अधिक परतावा मिळतो. या सरकारी योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, ULIP, पीपीएफ, ELSS आणि NSC इत्यादी योजनांचा समावेश आहे.

ELSS योजना फक्त तीन वर्षात मॅक्युअर होते. तर ह्यात मोठ्या कालावधीसाठी लॉक-इन कालावधी नसतो. तसेच याद्वारे मिळणार आर्तवही अस्थिर असतो. त्याचवेळी कर लाभासाठी रिटर्न आणि पेन्शन फंडाचा विचार करताना, राष्ट्रीय पेन्शन योजना एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावरही या योजनेत गुंतवणूक सुरु ठेवू शकता. यामधील गुंतवणूक करमुक्त असण्याबरोबर रिवॉर्डचा देखील समावेश आहे. यातून तुम्ही ९ते १२% परतावा मिळवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.