Nashik Graduate Constituency : तरुणांच्या, पदवीधरांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणारा नेता सत्यजीत तांबे

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. हा मतदारसंघ 2009 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण त्यात तांबे कुटुंबाचा मोठा वाटा आहे.

 

सत्यजित तांबे यांची प्रतिमा तरुणांच्या प्रश्नांवर संवेदनशील असणारा नेता अशी असल्याने या मतदारसंघात सध्या सत्यजित यांची सर्वाधिक चर्चा आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान अनेक तरुणांनी सत्यजितला भेटून त्यांच्याशी संवाद साधला.

 

 आता नाशिकमधील अनेक तरुण तांबे यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर करून त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सत्यजित तांबे यांची आगेकूच कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.