अजित डोवाल यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त खास…

रॉ ही भारतातील सर्वात मोठी गुप्त संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांची आज पुण्यतिथी आहे तर या संघटनेचे एक खूप नामवंत अधिकारी अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे.

 

रॉ एजेंट किंवा रॉ च्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी बोलायचं तर हे काम इतक्या गुप्तपणे केलं जातं की त्यांच्या कार्याविषयी कोणालाच काहीही माहिती नसतं. एवढंच काय तर त्यांच्या घरच्यांना याविषयी काहीही कल्पना नसते. कदाचित तुमच्याही आजुबाजूला रॉचे लोक असू शकतात. आज आपण रॉ मधे महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेले तसेच आताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी जाणून घेऊया.

 

डोवाल हे १९६८ बॅचचे IPS अधिकारी असून १९७२ पासून त्यांनी इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळ हा IB मध्ये घालवला. त्यानंतर ते २००५ मध्ये IB च्या संचालक पदावरून रिटायर्ड झाले.

 

अजित डोवाल हे परकीय शत्रुंसाठी खूप मोठा धोका होते. त्यांच्या नावाची पाकिस्तानमध्ये दहशत होती. अंडर कव्हर एजंट म्हणून ते जवळपास सहा वर्षे म्हणजेच १९९० ते १९९६ पर्यंत ते पाकिस्तानात होते. याशिवाय १९८८ मध्ये डोवाल यांनी ‘ऑपरेशन ब्लॅक ब्लंडर’ मध्ये रिक्षाचालकाचा वेश धारण करुन गुप्तहेर म्हणून महत्त्वाची भुमिका बजावली होती.

 

ऑपरेशन ब्लु स्टार मध्ये महत्त्वाची भुमिका

 

भारतीय सेनेच्या महत्त्वाच्या ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान त्यांनी गुप्तचर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी त्यांनी वेष बदलून भारतीय सेनेला महत्त्वाची माहिती पुरवली. याच महत्वपूर्ण माहितीच्या मदतीने हे ऑपरेशन यशस्वी झाले होते. या दरम्यान त्यांची भूमिका एका पाकिस्तानी गुप्तहेरची होती ज्याद्वारे त्यांनी खालिस्तानी लोकांचा विश्वास जिंकला होता. त्यांच्या अनेक गुप्त बातम्या ते भारतीय सेनेला देत होते. त्यांच्या ह्याच वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याच्या भूमिकेमुळे भारतीय लष्कराला अनेकदा फायदा झाला.त्यांच्याकडून यापुढील काळातही देशाची सेवा घडो ह्याच सजग मराठीकडून शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.