चंदीगढच्या महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली हि निवडणूक अत्यंत रंजक अशी होती. भाजप आणि आप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 14 मते होती. अनुपस्थिती मुळे काँग्रेस आणि अकाली दलाची मते बाद झाली. स्थानिक खासदाराच्या मताने भाजप विजयी झाला.
भारतीय जनता पक्षाने चंदीगढ़ महापालिकेच्या महापौरपदावर सलग आठ वेळा विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार अनूप गुप्ता यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार जसबीर सिंग यांचा पराभव करत महापौरपद मिळवले आहे. विशेष म्हणजे अनूप गुप्ता यांनी अवघ्या एका मताने हि निवडणूक जिंकली. चंदीगढ़ महापालिकेत एकूण 36 सदस्य आहेत. यापैकी 6 काँग्रेस नगरसेवक आणि शिरोमणी अकाली दलाचा (एसएडी) 1 सदस्य गैरहजर राहिले. त्याचा फायदा भाजपला झाला. दुसरीकडे भाजपचे 14 आणि आम आदमी पक्षाचे 14 नगरसेवक निवडणुकीत उतरले.
चंदीगढ़ च्या महापौरपदासाठी सभागृहात एकूण 29 मते पडली. भाजपला 14, तर आपला 14 मते मिळाली. मात्र चंदीगढ़ च्या खासदारांनी त्यांचे मत भाजप उमेदवाराला दिले. पीठासीन अधिकाऱ्याने कोणतेही मत रद्द केलेले किंवा अवैध आढळले नाही. मिळालेल्या मतांच्या आधारे भाजपचे उमेदवार अरुण गुप्ता यांना महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.