विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण कुलकर्णी यांची निवड…
पुणे, २४ सप्टेंबर –
नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेचे माजी प्राचार्य डॉक्टर अरुण कुलकर्णी यांची विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे नुतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कर्वे नगर येथील सरस्वती विद्यामंदिरात संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीद्वारे ही निवड करण्यात आली. ही निवड २०२२ ते २०२५ अशी तीन वर्षांसाठी असेल.
मावळते अध्यक्ष लातुरच्या केशवराज शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल महाजन आणि पश्चिम क्षेत्राचे मंत्री शेषाद्री डांगे यांनी डॉक्टर कुलकर्णी यांचे स्वागत केले. सकारात्मक काम लोकोपर्यंत पोहचवणे आणि पदाच्या गुणवत्तेची परंपरा पुढे चालु ठेवणे यासाठी सर्वांच्या मदतीने प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी संपुर्ण कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. कार्यकारीणी सदस्य म्हणून रघुनाथ देविकर, अच्युत कुलकर्णी, दादासाहेब काजळे, प्रगतीताई भावसार, शिरीश नाईकरे, रेखाताई जगदाळे, कचेश्वर साळुंखे यांची निवड करण्यात आली. अॅड. सुवर्णा पुराणिक आणि अॅड. राजिव मराठे यांनी निवडणुक निर्णय अधिकारा म्हणून काम पाहिले.
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील विविध शैक्षणिक संस्थांशी संल्गनता वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे मंत्री शेषाद्री डांगे यांनी केले. तसेच नविन शैक्षणिक धोरणा संदर्भात समाजात जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बैठकीमध्ये संघटनात्मक कार्याबद्दल विचार विनिमय करुन आगामी कार्ययोजना आखण्यात आली.