पुणे | पुण्यात महानगर पालिकेवर भाजपाची सत्ता आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजपने येथील नागरिकांना वेठीस धरले आहे. भाजपने सत्ता स्थपन करून साडेचार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत चालला आहे. हे पाहता पुणेकरांना निवडणुकीआधी भाजपने दिलेल्या आश्वासनाची आठव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला घेरण्याच्या तयारीत आहे.
आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपाच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. पुणे महापालिकेत भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र यानंतर भाजपने पुण्याच्या विकासासाठी कोणतेच काम केले नाही . भाजपकडून देण्यात आलेले वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…’ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या ‘मुंगेरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे.