टेस्ला आणि स्टारलिंक भारतात येणार? गडकरींचे आवाहन इलॉन मस्कची नेटकऱ्यांना उत्तरे

अमेरिकन उद्योजक इलॉन मस्कच्या सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी टेस्ला आणि स्टारलिंकच्या सेवा अद्याप भारतात सुरू झालेल्या नाहीत. भारतीय लोकं टेस्ला कार केव्हा खरेदी करू शकतील आणि स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा भारतात केव्हा सुरू होणार, असे प्रश्न अनेक दिवसांपासून भारतीय लोकं विचारत आहेत.bट्विटरवर सक्रिय असलेल्या इलॉन मस्कने आता या प्रश्नांची उत्तरे स्वतः ट्विटमध्ये दिली आहेत. मस्क यांनी भारतीय ट्विटर युजर्सच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

इलॉन मस्कने फिलीपिन्समध्ये स्टारलिंक कनेक्शनला परवानगी दिल्याबद्दल एक ट्विट केले होते, ज्यावर मधु सुदान व्ही नावाच्या भारतीयाने काही प्रश्न विचारले होते.
युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘टेस्लाबद्दल काय बोलावे? टेस्ला भविष्यात भारतात उत्पादन प्रकल्प उभारेल का?’
प्रत्युत्तरात मस्कने लिहिले की, ‘टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी उत्पादन प्रकल्प उभारणार नाही जिथे आम्हाला यापूर्वी आमच्या गाड्या विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही.’

भारतात उत्पादन करण्यासाठी मस्कला नितीन गडकरींचे आवाहन          एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की इलॉन मस्कचे भारतात ई-वाहने तयार करण्यासाठी स्वागत आहे, परंतु टेस्ला मालकांना चीनमध्ये कार तयार करून भारतात विक्री करायची असेल तर ही “चांगली योजना” ठरणार नाही. एका खाजगी कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते, “इलॉन मस्कला भारतात उत्पादन करायचे असल्यास कोणतीही अडचण नाही. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे त्यांची कंपनी उत्पादन खर्चही कमी करू शकते.”

स्टारलिंकच्या सेवा भारतात कधी येतील?
एका ट्विटर थ्रेडमध्ये, प्रणय पाटोळे नावाच्या आणखी एका भारतीय वापरकर्त्याने स्टारलिंक, या उपग्रह इंटरनेट सेवेबद्दल विचारले. मस्कची कंपनी स्टारलिंक, जी Space- X सह सोबत काम करत आहे , तिचा भारतात काम करण्याचा अनुभव चांगला नाही. सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या इशाऱ्यांनंतर, Starlink ला प्रीऑर्डर रद्द कराव्या लागल्या आणि प्री-बुकिंग केलेल्या ग्राहकांना परतावा द्यावा लागला. आम्ही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत असे मस्कने उत्तर दिले.

स्टारलिंकच्या परवानगीबद्दल काही अपडेट?
प्रणॉयने पुढे विचारले, ‘अ‍ॅलन, भारतात वापरण्यासाठी स्टारलिंकच्या परवानगीबद्दल काही अपडेट? जगभरात स्वस्त आणि जलद इंटरनेट उपलब्ध करून देण्याची स्टारलिंकची दृष्टी शानदार आहे. स्टारलिंक भारतात एकदम हिट ठरेल.उत्तरात इलॉन मस्क म्हणाले, ‘आम्ही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत.’
स्टारलिंकने भारतात तिच्या सेवांसाठी ५,००० हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे.

पर्यायी इतर ब्रँड स्टारलिंक-टेस्ला सारख्या सेवा देत आहेत
भारतात, Jio आणि Airtel देखील Starlink सारख्या उपग्रह आधारित इंटरनेट सेवांवर काम करत आहेत. जिओने यासाठी लक्झेंबर्गस्थित दूरसंचार कंपनी SES सोबत भागीदारी केली आहे. त्याच बरोबर, एअरटेल लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह संप्रेषण कंपनी OneWeb सोबत काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.