या मोठ्या नेत्याने स्वतः सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून घालून दिला मोठा आदर्श…
जाणून घ्या कोण आहे हा नेता!
सध्या लग्नसराई जोरात आहे, प्रत्येकजण विविध लग्न सोहळ्यांना हजेरी लावत असेलच. या लग्नांमध्ये आजकाल बस्त्यापासून ते बॅण्डपर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रचंड खर्च केला जातोय. अनेकदा लग्नातील थाट बघून तर डोळे विस्फारले जातात. स्वाभाविकच ‘लग्नावर होणारा खर्च’ या विषयावर लग्नमंडपात, चावडीवर, घराघरांत नक्कीच चर्चा झडत असणार. सामाजिक प्रश्न म्हणून यावर भाषणे झोडणारे नेतेही आपण खूप बघितले असतील. पण प्रत्यक्ष कृतीत त्यावर काही करणारे विरळाच!
परंतु महाराष्ट्रातल्या एका युवा नेत्याने थाटामाटात स्वतःचा स्वतंत्र शाही विवाह सोहळा करणे शक्य असूनही ते टाळले आणि आपल्या कृतीतून एक खूप मोठा आदर्श घालून दिला. त्या नेत्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे! १० वर्षांपूर्वी सत्यजीत तांबे यांनी स्वतः १२५ जोडप्यांसह सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं होतं. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात सर्व जोडप्यांचा पोशाख, जेवण, मिरवणूक इ. सर्व गोष्टी सर्वांसाठी सारख्याच होत्या. अगदी सत्यजीत तांबे देखील याला अपवाद नव्हते. त्यामुळे फक्त नावाला किंवा देखाव्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतः सामुदायिक पद्धतीने विवाह केला.
विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वैविध्यपूर्ण संकल्पना, समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सत्यजीत तांबे यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील महत्त्वाच्या सोहळा देखील सामाजिक भान ठेवून साजरा केला. हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्यांना व त्यांच्या सहचारिणी डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!