फक्त ५ हजार रुपयांत बुक करा टाटाची किफायतशीर सिएनजी कार

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच कार चालविणे अशक्य झाले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे बजेट पूर्ण बिघडले आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार खरेदी करण्यावर भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची मागणी वाढत चालली आहे.
त्यामुळे अनेक कार कंपन्याही ग्राहकांची गरज ओळखून सीएनजी व्हर्जनमध्ये आपल्या कार आणत आहेत. आता देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्स आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने नवीन Tiago CNG साठी बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात केली आहे. केवळ पाच हजार रुपयांत बुकिग करता येऊ शकते. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.