रस्त्याने चालले असताना महागडा मोबाइल तरुणाला सापडला. त्यांनी तो मंचर पोलिसांच्या स्वाधीन करून मूळ मालकाकडे परत केला आहे. तरुणांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एक रुग्ण उपचार घेत आहे. त्या रुग्णासाठी पाण्याची बॉटल आणण्यासाठी तरुण सचिन मोरडे निघाला होता. त्यावेळी रस्त्यात त्याला एक महागडा मोबाइल सापडला. हा मोबाइल कोणाचा आहे याची चौकशी त्यांनी आसपास केली. मात्र, मोबाइल मालक मिळू शकला नाही. शेवटी सचिन मोरडे, विशाल बाणखेले, महेश लंगडे या तिघांनी हा मोबाइल मंचर पोलीस ठाण्यात जमा केला.
- पोलिसांनी मोबाइलवरील माहितीच्या आधारे मूळ मालकाचा छडा लावला व सदरचा मोबाइल मूळ मालकाकडे परत दिला आहे. मोरडे यांच्या प्रमाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.