अनिल देशमुखांची लवकरच मंत्रिमंडळवापसी, गृहमंत्रीही होतील!
आमदार अमोल मिटकरी यांचे वक्तव्य...
100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची लवकरच मंत्रिमंडळवापसीची चर्चा रंगू लागली आहे. अशातच, ‘परमबिर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही. लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील आणि शरद पवार त्यांना पुन्हा गृहमंत्रिपद देतील असा विश्वास आहे’ असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात काही उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
‘अनिल देशमुख यांच्या संदर्भात भाजपने कटकारस्थान केले आहे हे आता समोर आले आहे. सचिन वाझे रोज रंग बदलतोय.. परमबिर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही. लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील आणि शरद पवार त्यांना पुन्हा गृहमंत्रिपद देतील असा विश्वास आहे, असं मिटकरी म्हणाले.