एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे स्पष्टपणे दिसतंय – वळसे पाटील

आज विधीमंडळात २९३ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देत असताना वळसे पाटलांनी अनिल देशमुख यांच्या प्रकरणाला हात घातला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई संदर्भात वळसे पाटील म्हणाले की, “घटना काय होती? तर अँटेलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या. त्या प्रकरणात मनसूख हिरेनचा खून झाला. केस एनआयएकडे गेली.अंबानींच्या घराच्याखाली जिलेटिनच्या कांड्या का ठेवल्या? याचे नेमके कारण एनआयएने अद्याप सांगितलेले नाही. या प्रकरणातील एक आरोपी पोलिस अधिकारी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप करतो आणि त्यातील सत्यता न पडताळता सक्तवसुली संचनालयाची (ईडी) रेड पडते. ईडीने आजवर देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर ९० छापे घातले आहेत. तपास कसा करावा हा भाग त्यांचा असला तरी एखाद्याला संपविण्यासाठी यंत्रणेचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे यातून दिसते!” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.