फडणवीसांचा डाव उलटणार? नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट!

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पेन ड्राइव्ह प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाची सीबीआई चौकशीची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकार या प्रकरणाची सीआईडी मार्फत चौकशी करण्यावर ठाम आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला. या पेन ड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणसं वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे.

मात्र यादरम्यान नवी माहिती समोर आली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमधून मोठी माहिती समोर आली आहे. फडणवीस यांनी दाऊद गँगचा संबंध असल्याचा आरोप केलेला मुदाससीर यांची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळात झाली होती, असं त्यांनी ट्विट केलं आहे. वक्फ बोर्डावर नियुक्ती ही 2019 नोव्हेंबरमध्ये झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.