महाराष्ट्रात सीएनजी, पीएनजी होणार स्वस्त; अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई | महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत मांडला. एकाबाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सीएनजीच्या किंमती (CNG) कमी होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी विधानभवनात केली. CNG आणि PNG (पाईप गॅस घरगुती वापराचा) वरील जीएसटी १३.०५ टक्क्यांवरून ३ टक्के केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला ८०० ते १००० कोटींचा फटका बसणार आहे. परंतु सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे.

विकासाची पंचसूत्री हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी. आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये, मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद, पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी 28 हजार 605 कोटी, उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.