नोएडामध्ये भाजप खासदार मनोज तिवारी यांना लोकांनी दाखवले जोडे; ‘अखिलेश जिंदाबाद’च्या दिल्या घोषणा

मनोज तिवारी यांच्या समोर नोएडामध्ये लोकांनी निदर्शने करत विरोध केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अखिलेश यादव जिंदाबादच्या घोषणा देत काही लोकं देत आहेत तर काही लोकं त्यांना परत जाण्यास सांगत आहेत.

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांच्या प्रचारासाठी पोहोचलेल्या खासदार मनोज तिवारी यांना नोएडात लोकांनी विरोध करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेक्टर-17 च्या झोपडपट्टी भागातील आहे, ज्यामध्ये काही लोक अखिलेश यादव झिंदाबादच्या घोषणा देत तिवारी यांना परत जाण्यास सांगत आहेत. या दरम्यान, एका मतदाराने आधी घोषणाबाजी केली आणि नंतर तिवारी यांना जोडे दाखवून विरोध केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लोक खासदार मनोज तिवारी यांचा विरोध करताना दिसत आहेत. यामध्ये एका मतदाराने आधी घोषणाबाजी केली आणि नंतर जोडे दाखवून विरोध केला. यानंतर एक महिलाही अखिलेश यादव यांच्या घोषणा देत तेथून निघून गेली. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मनोज तिवारी याठिकाणी गेले होते. प्रचाराची सुरुवात सेक्टर-17 झुग्गी ढोपरी येथून झाली आणि इथेच त्यांना विरोध झाला. विरोधाला न जुमानता मनोज तिवारी यांनी श्रमिक कुंज, सेक्टर-66, सेक्टर-71, सेक्टर-82 येथे घरोघरी जाऊन भाजप उमेदवाराचा प्रचार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.