BSNL ला मिळणार उभारी, सरकार ₹ 44,720 कोटी भांडवल पुरवणार

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थसंकल्पानुसार, पुढील आर्थिक वर्षात सरकार तोट्यात चाललेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला (BSNL) ₹ 44,720 कोटी देण्यात येणार आहे .अर्थसंकल्पीय दस्तऐवजातील स्पष्टीकरणात्मक नोटमध्ये म्हटले आहे की, BSNL मध्ये 4G स्पेक्ट्रम, तंत्रज्ञान अपग्रेडेशन आणि पुनर्रचना यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी हि तरतूद करण्यात आली आहे.

भांडवलाशिवाय, स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी सरकार BSNL ला ₹ 7,443.57 कोटी अतिरिक्त आर्थिक सहाय्य देईल आणि GST भरण्यासाठी ₹ 3,550 कोटी अनुदान मदत म्हणून देईल. स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी (VRS) आर्थिक सहाय्यामध्ये BSNL आणि MTNL या दोन्ही ठिकाणी योजनेची अंमलबजावणी समाविष्ट आहे.
अर्थसंकल्पानुसार 4G स्पेक्ट्रमच्या वाटपावर GST भरण्यासाठी BSNL ला GST साठी अर्थसहाय्य प्रदान केले जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य हे सरकारने त्यांना ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदान केलेल्या ₹ 69,000 कोटींच्या मदत पॅकेजच्या व्यतिरिक्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.