नवी दिल्ली | दिवंगत अधिकारी आणि भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे बंधू कर्नल विजय रावत यांनी आज उत्तराखंडमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. “माझे वडील जनरल लक्ष्मणसिंह रावत हे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर भाजपसोबत होते. आता मला संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरदृष्टी आहे. त्यांचे सर्व कार्य हे देशाच्या प्रगतीसाठी आहे. मला भाजपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. उत्तराखंडसाठी त्यांची योजना आहे,” असे कर्नल विजय रावत यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत सांगितले.
कर्नल रावत यांचे पक्षात स्वागत करताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या भावाची आठवण झाली. “जनरल रावत यांना उत्तराखंडमध्ये आणखी काम करायचे होते. त्यांचा भाऊ आमच्यासोबत आला याचा आम्हाला आनंद आहे. मी अधिक आनंदी आहे कारण मी देखील एका सैनिकाचा मुलगा आहे. आम्ही जनरल रावत गमावले तेव्हापासून आम्हाला शून्यता वाटते. त्यांचा भाऊ आता आमच्यासोबत आहे. ” असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले.