जुन्नर तालुक्यातील विविध ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर आ.अतुल बेनके यांची माहिती

नारायणगाव | मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३० विविध विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी माध्यमांना दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, “बऱ्याच वर्षांपूर्वी पाझर तलाव व वळण बंधाऱ्यांची कामे करण्यात आली होती परंतु सदर कामांच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी उपलब्ध होत नव्हता. आता मात्र शासन स्तरावर याबाबत मागणी केल्यानंतर पुढील कामांना दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे यामध्ये खालील कामांना मंजुरी मिळाली आहे.
– शिंदेवाडी येथील इटकाई शेड गाव तलाव दुरुस्ती – ९ लक्ष २१ हजार रुपये
– आणे येथील (चौंडी) पाझर तलाव दुरुस्ती – २५ लक्ष २१ हजार रुपये,
– आणे येथील आनंदवाडी (आंबा विहीरदरा) पाझर तलाव दुरुस्ती – ३५ लक्ष ३१ हजार रुपये,
– शिंदेवाडी येथील कापूरवाडी / आंबूडोह गाव तलाव दुरुस्ती – २४ लक्ष ९६ हजार रुपये,
– शिंदेवाडी येथील राना / राजई गावतलाव दुरुस्ती – २० लक्ष ७५ हजार रुपये
– शिंदेवाडी येथील (पाईन) गावतलाव दुरुस्ती – ४ लक्ष ९५ हजार रुपये,
– शिंदेवाडी येथील वाळूज देव ओढा वळण बंधारा दुरुस्ती – १६ लक्ष ३५ हजार रुपये,
– शिंदेवाडी येथील वळण बंधारा दुरुस्ती – ११ लक्ष ५२ हजार रुपये,
– नळावणे येथील हडकी हाडवळा वळण बंधारा दुरुस्ती – ४ लक्ष ७७ हजार रुपये,
– नळावणे येथील डुक्करचौंड वळण बंधारा दुरुस्ती- ४ लक्ष ७८ हजार रुपये,
– नळावणे येथील (जाभाचा डोह) वळण बंधारा दुरुस्ती -४ लक्ष ४५ हजार रुपये,
– नळावणे येथील सावरपट्टा वळण बंधारा दुरुस्ती – ४ लक्ष ५८ हजार रुपये,
– नळावणे येथील वळण बंधारा दुरुस्ती – ८ लक्ष २९ हजार रुपये, – गोद्रे येथील (गोदर ओहोळ) वळण बंधारा दुरुस्ती – ५ लक्ष ९६ हजार रुपये

तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध १६ कामांना पुढीलप्रमाणे निधी मंजूर झाला असून यामध्ये खालील कामांना मंजुरी देण्यात आली आहे
– ओतूर येथील मधलेमाळ समाजमंदिर बांधणे – ३ लक्ष रुपये,
– ओतूर येथील कोल्हाटी वस्ती समाजमंदिर बांधणे – ३ लक्ष रुपये,
– पिंपरी पेंढार येथील गौतमनगर (मागासवर्गीय वस्ती) समाजमंदिर बांधणे – ३ लक्ष रुपये,
– ओतूर येथील मातंग वस्ती ते स्मशान भूमी रस्ता करणे – ४ लक्ष रुपये,
– पिंपळवंडी वैशाखखेडे ते शिंदेवाडी रस्ता करणे – ४ लक्ष रुपये,
– कांदळी गावठाण मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता करणे – ४ लक्ष रुपये,
– येणेरे येथील मागासवर्गीय वस्ती मधील कान्होबा मंदिर सभामंडप बांधणे – ७ लक्ष रुपये,
– वडगाव आनंद गावठाण येथे नवबौध्द वस्ती येथे चौक सुशोभिकरण करणे ४ लक्ष रुपये, – वारुळवाडी नेवकरपुल मागासवर्गीय वस्ती ते भागेश्वर मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे १० लक्ष रुपये,
– हिवरे बु. पॉवर हाऊस गेट ते पाण्याची टाकी (मागासवर्गीय) रस्ता करणे १० लक्ष रुपये,
– कोल्हेवाडी मागासवर्गीय वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये,
– मांदारणे मागासवर्गीय वस्ती गावठाण ते मुक्ताई रस्ता खडीकरण व सुधारणा करणे १० लक्ष रुपये,
– वडगाव आनंद गावठाण येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे ४ लक्ष रुपये,
– सांगनोरे मागासवर्गीय वस्ती समाजमंदिर बांधणे १० लक्ष रुपये,
– मौजे शिरोली खु. गरमाई ते मागासवर्गीय वस्ती रस्ता खडीकरण करणे १० लक्ष रुपये,
– निमगाव तर्फे महाळुंगे मागासवर्गीय चौक सुशोभिकरण करणे ४ लक्ष रुपये
आदी ३० विकास कामांना २ कोटी ८१ लक्ष ९ हजार रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कामांना सुरुवात केली जाईल असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.