इंडिया ओपनमधून सायना नेहवाल बाहेर; नागपूरच्या मालविका बनसोडकडून सायनाचा पराभव!

इंडिया ओपनमधून सायना नेहवाल बाहेर; नागपूरच्या मालविका बनसोडकडून सायनाचा पराभव!

इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीच्या लढतीत सायना नेहवालचा २१-१७, २१-९ असा पराभव झाला. ३४ मिनिटे चाललेल्या या लढतीत नागपूरच्या मालविका बनसोडने चांगला खेळ दाखवत सायनाचा धक्कादायक पराभव केला. भारताची शटलर आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल निराशाजनक कामगिरीमुळे गुरुवारी इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतून बाहेर पडली. नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नागपूरच्या मालविका बनसोडने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनाचा २१-१७, २१-९ असा पराभव केला.

३१ वर्षीय फुलराणी पहिल्या फेरीत ५-७ ने पिछाडीवर होती त्यामुळे मालविकाचा आत्मविश्वास वाढल्याने तिने पहिला गेम २१-१७ असा जिंकला. या फेरीनंतर मालविकाने मागे वळून पाहिलेच नाही त्याच आत्मविश्वासाने खेळाचा वेग कायम ठेवत ३४ मिनिटांत सामना जिंकला. या पराभवामुळे सायना नेहवाल स्पर्धेतून बाहेर पडली.

मालविका बनसोड ही महाराष्ट्रातील नागपूरची असून महाराष्ट्राची एक उगवती स्टार बॅडमिंटनपटू म्हणून तिची ओळख आहे. मालविकाने १३ आणि १७ वर्षांखालील राज्य स्तरावरच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच २०१८ मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली होती. मालविकाने राष्ट्रीय कनिष्ठ व ज्येष्ठ गट स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. २०१९ मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीझ बॅडमिंटन या स्पर्धांंमध्ये तिने आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.