सप्टेंबर महिन्यापासून बंद असलेलं अवसरी कोविड सेंटर तत्काळ कार्यान्वित करा! अरुण गिरेंची मागणी
गेल्या काही दिवसांत आंबेगाव तालुक्यात Covid19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा अन्य ठिकाणी रुग्णांना जाणं परवडत नसल्याने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खु. येथील शिवनेरी जम्बो कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी केली आहे.
याबाबत अरुण गिरे यांनी नेमकी काय मागणी केली आहे?
तालुक्यात दररोज सरासरी 20 – 25 Covid19 पॉझिटीव्ह रूग्ण सापडत आहेत. अवसरी खु. येथे २५ कोटी रुपये खर्चून उभारलेले कोविड केअर सेंटर सप्टेंबर महिन्यापासून बंद आहे. ते सुरू नसल्याने अनेक रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. तो खर्च प्रत्येकाला पेलवेल अशी परिस्थिती नाही. लक्षणे नसलेले अनेक रूग्ण घरीच उपचार घेत आहेत त्यातून संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे, म्हणून रुग्णांच्या सोयीसाठी अवसरी येथील शिवनेरी कोविड सेंटर तात्काळ कार्यान्वित करावे. अशी मागणी अरुण गिरे यांनी केली आहे. हे जम्बो कोविड सेंटर 16 जानेवारी पर्यंत सूरू न झाल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.