काल मौर्य, आज चौहान; आणखी एका मंत्र्याचा राजीनामा! संजय राऊत म्हणतात …?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश सरकार मधील ओबीसी चेहरा असलेले स्वामी प्रसाद मौर्य आणि 4 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज आणखी एक धक्का उत्तर प्रदेश भाजप ला बसला आहे. या निमित्ताने भाजप अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मंत्र्यांच्या राजीनामा सत्रामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना स्वामी प्रसाद मौर्य यांना परत आणण्यासाठी पराकाष्ठा केली परंतु स्वामी प्रसाद यांनी समाजवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला हा भाजपला जबरदस्त धक्का मानला जात आहे. त्यातच आज पुन्हा उत्तर प्रदेश सरकार मधील आणखी एक मंत्री दारासिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंह यांचा राजीनामा ट्विट करत उत्तर प्रदेश परिवर्तन की और … असं शीर्षक देत या वरून भाजप ला डिवचलं आहे.

मी समर्पित भावनेने काम केले, परंतु मागास, वंचित घटक, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांप्रती या सरकारच्या जाचक वृत्तीमुळे आणि मागासवर्गीय आणि दलितांच्या कोट्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे दुखावले गेल्याने मी राजीनामा देत आहे,” असे चौहान यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे. , स्वामी प्रसाद मौर्य सारखीच भाषा वापरली आहे.

पूर्व यूपीचे असलेले दारा सिंह चौहान 2015 मध्ये मायावतींचा बहुजन समाज पक्ष (BSP) सोडल्यानंतर भाजपमध्ये दाखल झाले. 2009 ते 2014 पर्यंत ते बसपचे खासदार होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना पक्षाच्या ओबीसी युनिटचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले होते. सलग दुसऱ्या ओबीसी नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. समाजवादी पक्ष एकीकडे आव्हान निर्माण करत असताना योगी आदित्यनाथ यांचे सहकारी त्यांना सोडून जात आहेत. हे चित्र भाजपसाठी चांगले नाही याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.