पाच राज्यांत पवारांनी ठोकले शड्डू , राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार!

मुंबई | लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही समाजवादी पक्षासोबत एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे.

‘पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार होते. तिथे काँग्रेससोबत पाच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तसंच गोव्यात काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. काही ठिकाणी आम्ही जागा लढवू इच्छित आहोत. त्याची माहिती दोन्ही पक्षाला दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्णय होईल, असं पवार यांनी सांगितलं. “गोव्यात परिवर्तनाची आवश्यकता असून जनमत भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे या राज्यातील निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसशी चर्चा सुरु आहे. गोव्यात भाजपविरोधात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करणार आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.