खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?

खा.अमोल कोल्हे आणि आ.महेश लांडगे यांचे याविषयावर झाले एकमत, काय आहे हा विषय?भोसरी | खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ होण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता एकत्र यावे अशी साद महेशदादा लांडगे यांनी खा.अमोल कोल्हे यांना घातली. यावर खा.कोल्हे यांनीही खेड तालुक्यात विमानतळ व्हावे यासाठी एकत्र प्रयत्न करणार व यासाठी पुढाकार घेऊ असा प्रतिसाद दिला आहे.

खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक विमानतळ व्हावे यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रयत्न करावेत. या आ.महेश लांडगे यांच्या भूमिकचे मी मनापासून स्वागत करतो. विकासात कोणतेही राजकारण असता कामा नये ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो आहे. त्यामुळे खेड विमानतळासाठी पक्षविरहीत प्रयत्न व्हावेत यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. तसेच या विषयाची सखोल माहिती घेऊन त्यानुसार पाठपुरावा करण्याचे आश्वासन देतो. आपल्या मतदारसंघातील विकासकामांविषयी सदैव स्वागतच आहे.त्याचबरोबर आपण नमूद केलेल्या औद्योगिक पट्ट्यातील मोठा कर्मचारीवर्ग भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असून दररोज वाहतूक कोंडीला सामोरा जातो आहे. या कर्मचारी वर्गाला दिलासा देण्यासाठी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी टप्प्यातील रस्त्याचे भूसंपादनाअभावी रखडलेले कामही मार्गी लागणे आवश्यक आहे. महापालिकेकडून ही भूसंपादन प्रक्रिया लवकर झाल्यास सहापदरीकरणाच्या कामाला गती मिळेल. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपल्या पक्षाची सत्ता असून सदर भूसंपादनासाठी आपले सहकार्य लाभावे अशी अपेक्षा आहे. या आशयाचे पत्र खा.अमोल कोल्हे यांनी आ.महेश लांडगे यांना लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.