अर्थसंपदा पतसंस्था आयोजित जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत ५०० स्पर्धकांचा सहभाग, खुल्या गटात हनुमान चोपडे प्रथम

नारायणगाव | सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने अर्थ संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव आयोजित संस्थापक /अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल स्पर्धा नारायणगाव मध्ये आयोजन रविवार दि.०२ जानेवारी रोजी पार पडल्या. या सायकल स्पर्धेमध्ये एकूण 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला. जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला अशी माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी दिली.

पुरुष आणि महिलांच्या विविध वयोगटात हि स्पर्धा खेळवली गेली. स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत खालील खेळाडूंनी यश संपादन केले.

खुला गट पुरुष :
प्रथम क्रमांक- चोपडे हनुमंत यशवंत
द्वितीय क्रमांक – रमाणे चिन्मय केवळ
तृतीय क्रमांक – हराळ कृष्णा नवनाथ

खुला गट महिला
प्रथम क्रमांक – गोरे अपूर्वा गोरक्ष
द्वितीय क्रमांक – डोंगरे अक्षदा अनिल
तृतीय क्रमांक – वळे सानिका रामदास

छोटा गट मुले
प्रथम क्रमांक – धामणे प्रणव दत्तात्रय
द्वितीय क्रमांक – राज नारायण कारंडे
तृतीय क्रमांक – क्षौनिश राजेश

छोटा गट मुली
प्रथम क्रमांक – गोरे अपर्णा जालिंदर
द्वितीय क्रमांक – खेबडे आदिती नवनाथ
तृतीय क्रमांक – कानडे पायल प्रशांत

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मिलिंद झोडगे यांनी सांगितले, ” खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा भरवण्यासाठी अर्थसंपदा सारख्या संस्थांनी पुढे आले पाहिजे. सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अर्थ संपदा पतसंस्था व सर्व संचालक मंडळ व बक्षिसे व प्रायोजकत्व देणाऱ्या मान्यवरांचे आभार मानतो”

“अर्थ संपदा पतसंस्था नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते. आज खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ संपदा पतसंस्थेने सायकल स्पर्धा आयोजन करण्याचे ठरवले आणि त्या यशस्वी रित्या पार पाडल्या. यापुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अग्रेसर राहू” असे मत संस्थेचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मत मांडले.
यावेळी क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंदजी झोडगे, माजी आमदार शरद सोनवणे, कृषिरत्न ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, नारायणगाव लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, गणेश वाजगे, गुंजाळवाडी सरपंच रेश्मा वायकर, खोडद गावच्या सरपंच सविता गायकवाड, मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, गुंजाळवाडीचे उपसरपंच रमेश ढवळे, नारायणगावच्या उपसरपंच पुष्पाताई आहेर, दीपक वारुळे, राजेन्द्र कोल्हे, सबनीस विद्यामंदिर चे मुख्याध्यापक वाघुले सर आदी मान्यवर उपस्थित होते. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक राऊत सर, पालवे सर गुळवे सर, जेष्ठ क्रीडा शिक्षक नरसुडे सर, पानसरे सर, हाडवळे सर, गाळव सर, कानडे सर, अमित झरेकर, मुकेश वाजगे, प्रशांत गुंजाळ, विनय बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ही स्पर्धा पार पाडण्यासाठी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. अमेय डोके व डॉ.लहू खैरे, नारायणगाव पोलीस स्टेशन, क्रीडा प्रशिक्षक तुळशीदास कोऱ्हाळे, ऍड. राजेन्द्र कोल्हे, अभिजित विटे, पत्रकार स्वप्नील ढवळे, सचिन भोर , राजेंद्र खिलारी, मच्छिंद्र शेळके, प्रकाश नेहरकर, सुनिता भोर, कविता मंचरे, स्वाती बढे ,उत्तम मेहेत्रे, अक्षय बोडके, निलेश कोल्हे, रुपेश कानडे, प्रसाद शिंदे, यांचे विशेष सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज बेल्हेकर यांनी केले व गुळवे सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.