“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका, मारू नका”, शिवसेना उपनेत्यांची संतप्त प्रतिक्रिया!

बैलगाडा शर्यतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्या नंतर यावरून आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

“आघाडीतील घटक पक्षाने आम्हांला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये. आमची कुठलीच मागणी नाही, फक्त आम्हाला शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, मारू नका,” असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. आढळराव पाटील यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत रद्द झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी हे लिहून द्या, ते लिहून द्या म्हणत गावातील यात्रा कमिटीकडून अनेक कागदपत्रे घेतली. तसेच रात्री माझ्या घरी येऊन बैलगाडी शर्यतीला ५० पेक्षा अधिक माणसं येऊ देणार नाही असं सांगितलं. यावर मी म्हटलं दिवसभरात जिल्हा बँकेची राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली. त्या सभेत १०,००० लोक होते. ते कसे चालले? आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये, आम्ही तुमच्याकडे, सरकारकडे काही मागत नाही. आमची कुठलीच मागणी नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका,” असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.

1 Comment
  1. Ofelia Goldsbrough says

    Free submission of your new website to over 1000 business directories here bit.ly/submit_site_2

Leave A Reply

Your email address will not be published.