बँकांनी वाढविला FD वरील व्याजदर! कर्ज होणार महाग?
बँकांनी वाढविला FD वरील व्याजदर! कर्ज होणार महाग?
खात्रीशीर परताव्याच्या दृष्टिकोनाने मुदत ठेव योजनेकडे बघितले जाते. यामध्ये सुरक्षा आणि व्याज दोन्ही मिळत असल्याने खात्रीची गुंतवणूक म्हणून एफडी हा पर्याय निवडला जातो.
प्रत्येकजण आपली कमाई, बजेट प्रमाणे पैश्यांचे प्लॅनिंग, नियोजन करत असतात. भविष्य सुरक्षित ठेवणे व अधिकचा परतावा मिळावा यासाठी सगळेच वेगवेगळे मार्ग शोधत असतात.
यावर्षी मुदत ठेव व बँकेतील व्याजदर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एफडीवरील व्याज दरात यापूर्वीच एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांनी वाढ केली आहे. यामुळे गुंतवणूक करणारे या बँकांच्या एफडीकडे आकर्षित होत आहेत.
बजाज फायनान्सच्या एफडीतील व्याजदरात बऱ्याच कालावधीनंतर वाढ केली गेली आहे. 0.30 %नी हि वाढ केली आहे. 24 ते 35 महिन्यांसाठी मुदत ठेवींवर 6.35% हून व्याजदर 6.65 टक्के मिळेल. तर 36 ते 60 महिन्यांच्या एफडीवरील व्याज 6.75 हून व्याजदर 7.05 टक्के मिळेल.
एचडीएफसी बँकेने एक आणि दोन वर्षांच्या एफडीवर 0.5% नी वाढ केली असून आता 4.85 हून व्याजदर 4.90 टक्के झाला आहे. एचडीएफसी बँकेचे व्याज 4.50 टक्क्यांहून 5.15 % करण्यात आले आहे.
कर्ज होणार महाग?
कोरोना महामारीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रथम कर्ज स्वस्त करण्यात आले तसेच चलनी नोटा छापण्यात आल्या. परंतु आता कर्ज महाग होण्यास सुरुवात झालेली दिसत आहे.
कीर्तन शहा, क्रेडेंस वेल्थ एडवायझर चे सीईओ यांच्या म्हणण्यानुसार, मुदत ठेव योजनेत दीर्घ मुदतीत गुंतवणूक करण्याऐवजी अल्प मुदत फायद्याची ठरेल. यात व्याजदर वाढीचा फायदा होईल. दीर्घ मुदतीत जर रक्कम असेल तर ती काढल्यास दंडभरावा लागतो, त्यामुळे अल्प मुदत ठेव फायदा देईल. कोविड चे नवे व्हेरियंट मिळत असल्याने व्याजदर हळूहळू वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्राहकांनी गुंतवणुकीकडे पाहताना महागाईकडेही लक्ष द्यावे. खर्च भागल्यानंतर उरलेल्या रक्कमेतून गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.