इलेक्ट्रिक कार ! या कारची किंमत आणि वेग पाहून व्हाल अवाक्! पहा या भन्नाट कारची वैशिष्ट्ये
इलेक्ट्रिक कार !!!१२ सेकंदात पकडते ३०० किमीचा वेग !
आनंद महिंद्रा यांनी आपल्या नवीन प्रोजेक्ट चे म्हणजेच १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा धमाकेदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत.
ट्विटरवर नेहमीच सक्रिय असणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा त्याच्या ट्विटर हँडलवर नेहमीच नाविन्यपूर्ण व्हिडिओ शेअर करताना दिसतात. तसेच क्रिएटिव्ह लोकांना ते नोकरीत नेहमीच प्राधान्य देताना दिसतात.
जर्मनीच्या ऑटोमोबिली Pininfarina या इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार Battista चे उत्पादन महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी सुरू करणार असल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे.
या कार निर्मितीसाठी भांडवल उभारण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात झाली असल्याचेही वृत्त समोर येत आहे.
काय आहे ही battista?
या कारचा पहिला प्रोटोटाइप २०१९ च्या जिनिव्हा ऑटो शोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता त्यानुसार battista ही हायपर इलेक्ट्रिक कार आहे.
Pininfarina Battista इलेक्ट्रिक कारमध्ये १२० किलोवॅटची लिथियम-आयन बॅटरी पॅक असून कार १९०० एचपी पॉवर जनरेट करते. चार इलेक्ट्रिक मोटर्स असून कारच्या चार चाकांना वेगवेगळी ऊर्जा पुरवली जाते. या वेगळेपणामुळे वेगाच्या बाबतीत इतर कंपन्यांना ओव्हरटेक करू शकते.
पिनिनफारिना बॅटिस्टा केवळ २ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते तर १२ सेकंदात ३०० किमी प्रतितास वेग गाठू शकते. टॉप स्पीडचा विचार केल्यास तो ३५० किमी प्रतितास आहे.या इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे २२ लाख डॉलर (जवळपास १६.३५ कोटी रुपये) आहे.
Yesterday we shared the first images of #Battista finished in #OroLiquido – a lustrous #paint that reflects the nobility of gold. This is the interior combination – a refined mix of materials and colours that is subtle and sophisticated. Discover more at https://t.co/00rXGPgI1k pic.twitter.com/9AmCAey6uE
— Automobili Pininfarina (@AutomobiliPinin) December 30, 2021
Pininfarina Battista इलेक्ट्रिक कार एका चार्जवर ५०० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते असा कंपनी दावा करत आहे. या कारचे फक्त १५० युनिट्स बनवले जाणार असून जगभरातील बाजारात विकले जातील. Battista चे प्रत्येकी ५० युनिट्स युरोपमध्ये, अमेरिकेत आणि पश्चिम आशिया आणि आशियाई मार्केटमध्ये विकले जातील. सध्या अमेरिका आणि युरोपमधील रस्ते आणि ट्रॅकवर चाचणी सुरू आहे.