बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, आमदार नितेश राणे यांची मागणी! गृहमंत्री म्हणतात वटहुकूम काढू…
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांनाही सुरू करण्याची परवानगी मिळावी. या कार्यक्रमांत बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
बैलगाडा शर्यत सुरु करण्या संदर्भात काल पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली असून यासंदर्भात वटहुकूम काढून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.