सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक | महाविकास आघाडीचा पराभव, राणेंची सरशी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक | महाविकास आघाडीचा पराभव, राणेंची सरशी

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत नारायण राणे गटाने वर्चस्व राखत भाजपची सत्ता आणली आहे. महाविकास आघाडीला हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर राणेंनी बाजी मारत सत्ता खेचून आणली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) हे पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल आणि भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनेल मध्ये हि निवडणूक रंगली होती. यातील 19 पैकी 11 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत त्यांचे विरोधी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष नारायण राणे यांच्या ताब्यात होती. मात्र 2019 मध्ये बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे. आता या बँकेवर भाजपची सत्ता असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.